कोरोना पार्श्वभूमीवर आमदार दीपक चव्हाण यांनी घेतला आढावाकोरोना पार्श्वभूमीवर आमदार दीपक चव्हाण यांनी घेतला आढावा 


---- पिंपोडे बुद्रुक ,प्रतिनिधी (अभिजीत लेंभे) कोरोना संसर्ग केव्हा थांबणार अद्याप माहिती नाहीये,परंतु त्याचा सध्या झपाट्याने होणारी वाढ आणि येत्या काही दिवसात त्याचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे.प्रशासन यांबाबत अधिक खबरदारी घेत आहे, मात्र कोरेगाव तालुक्यातील सर्वच गावांसह वाघोली,पिंपोडे बुद्रुक, सोनके ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सुचणेचे पालन करुन,कोव्हीडच्या 19 (कोरोना)च्या संसर्ग विषयी, सर्वसामान्यानी सतर्क राहण्याबाबतचा इशारा कोरेगाव कोरेगाव तालुक्यातील वाघोली, पिंपोडे बुद्रुक आणि सोनके येथील कोरोना बाधित रुग्ण सापडलेच्या पार्श्वभूमीवर वाघोली आणि पिंपोडे येथील कोरोना कन्टेनमेंट झोन परिसराची पाहणी करुन, ग्रामस्थांसह प्रत्येक विभागातील प्रशासकीय यंत्रणेची खबरदारी विषयाचा आढावा ,व माहिती घेतली, प्रशासनाच्या अंमलबजावणीसह ग्रामस्थांनीही या कोव्हीड 19 बाबत सतर्क राहिले पाहिजे.त्याचा बाऊ न करता मास्क वापरणे,ठराविक अंतराचे पालन करणे,गर्दी न करणे,सँनिटायझरचा वापर करणे अशा सूचनेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.असे आ.दिपक चव्हाण यांनी सांगितले.यावेळी आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका, महसूल प्रशासन,व स्थानिक समिती व कमिटीला सुध्दा महत्वाच्या सूचना केल्या व आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या प्रशासनाला सर्वानी सहकार्य करावे कोणीही गर्दी करु नये अत्यावश्यक कारणाशिवाय घरा बाहेर पडू नये आणि कोरोना विरोधातील लढाई जिकंण्यासाठी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन आ.दिपक चव्हाण यांनी केले.यावेळी प.स.समितीचे उपसभापती संजय साळुंखे, सरपंच नैनेश कांबळे,उपसरपंच अमोल निकम,माजी.पं स.सदस्य अशोकराव लेंभे माजी संरपच विकास साळुखे,गजानन शेठ महाजन ,पत्रकार रेवणसिध्द महाजन ,धनसिंग साळुंखे,, रवी पवार ,अभिजीत लेंभे तलाठी,श्रीकांत सांवत ,सर्कल सुहास सोनवणे कुषी आधिकारी पोपटराव कोलवडकर आरोग्य सेवक D.L. गायकवाड ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका ,आशाताई व ग्रामस्थ उपस्थित होते.