म्हसवड येथून परप्रांतीय  मजूर गावाकडे .म्हसवड करांनी दिला निरोप.


म्हसवड (प्रतिनिधी )
म्हसवड येथून परप्रांतीय असणाऱ्या मजुरांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून आपापल्या राज्यात नुकतेच म्हसवड  येथून पाठवण्यात आले.
महाराष्ट्र शासन महाविकास आघाडीतर्फे कोरोना लॉक डाऊनमुळे  कामानिमित्त आलेल्या ठिकाणी परप्रांतीय मजूर अडकलेले होते. या मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी महाविकास आघाडी शासनातर्फे मोफत बसगाड्यांची सोय करण्यात आली . दहिवडी आगाराच्या तीन  बसमधून साठ प्रवासी विभागून मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. निरोप देताना परप्रांतीय मजुरांना अक्षरश गहिवरून आले . लॉक डाऊनच्या  कालावधीमध्ये  म्हसवड  परिसरातील शासन प्रतिनिधी, संस्था व दानशूर व्यक्तींनी आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले तसेच खाण्या पिण्याची  चांगली सोय केली . त्याबरोबरच आम्हाला गावापर्यंत मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली . त्याबद्दल   आम्ही महाराष्ट्र शासनाचे तसेच स्थानिक प्रशासनाचे , दानशूर व्यक्तींचे आभारी आहोत . 
म्हसवड येथे परप्रांतीय मजुरांना निरोप देताना नायब  तहसीलदार हिरवे , राष्ट्रीय काँग्रेसचे नेते प्रा.  विश्वंभर  बाबर ,राष्ट्रवादी जिल्हा महिला कार्याध्यक्ष कविता म्हेत्रे,  नगरसेवक धनाजी माने , म्हसवड तलाठी आखडमल , म्हसवड आगार प्रमुख कोळी , कांता ढाले तसेच पोलीस प्रतिनिधी उपस्थित होते .