म्हसवड ,(विजय टाकणे याजकडून)
माण तालुक्यातील लोक पैशाने गरीब आहेत, मात्र मनाने श्रीमंत च आहेत. याचा नेहमी प्रत्यय येतो. सांगली, कोल्हापूर ला पुरात पहिली मदत दुष्काळी माण ,खटाव,आटपाडी मधील जनतेने केली.
गोंदवले येथील एका नवदाम्पत्याने आपली गरीबी असतांना सुध्दा साधेपणाने लग्न करुन लग्नाच्या खर्चाचे 25 हजार रुपये कोरोना ग्रस्त लोकांच्या साठी मुख्यमंत्री निधी ला दान केले. हे फक्त माणदेशी माणुसच करु शकतो.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अगदी सध्या पद्धतीने विवाह करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रुपयांची रक्कम देऊन नरवणे येथील नवदाम्पत्याने आपल्या सपना तील आनंदाला गवसणी घातली.
नरवणे ता.माण येथील एम.एस .सी झालेली सपना अरुण काटकर ही कुकुडवाडच्या माध्यमिक शाळेत टेम्परारी शिक्षिका म्हणून काम करते.
तर खुटबाव येथील आनंदा बाजीराव शिंदे हे पुणे येथील खाजगी कंपनीत नोकरी करतात.
या दोघांचा विवाह गेल्या नोव्हेंबर मध्ये ठरला होता.
मे महिन्यात विवाह सोहळा घेण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला होता.
पण कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाले.
त्यामुळे हा विवाह मोठ्या उत्साहात करण्याच्या आशा मावळल्या.
परंतु अरुण आणि वधू सपना यांनी हा विवाह ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी करण्याचा निर्णय घेतला.
सोशल डिस्टनसिंग व इतर आवश्यक नियमांचे काटेकोर पालन करून हा विवाह करू अशी विनंती वराकडील मंडळींना करण्यात आली.त्यानुसार नरवणे जवळच्या जाधववाडीतील खंडोबा मंदिरात अगदी सध्या पद्धतीने हा विवाह गुरुवारी दुपारी संपन्न झाला. या विवाहासाठी अगदी मोजकेच वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती.
कोरोनाच्या आपत्ती काळात सध्या पद्धतीने विवाह करून लग्नाच्या जेवणावळीसाठी होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय वधू वराने घेतला.त्यानुसार दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दीक्षित यांच्याकडे 25 हजार रुपयांच्या निधीचा डीडी सुपूर्त करण्यात आला. यावेळी नरवणेचे पोलीस पाटील विजयसिह काटकर उपस्थित होते. या विवाहाची व वधू वराने घेतलेल्या शासनाला मदतनिधी देण्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.